साहित्यिक संजय येरणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वाड्.मयीन कार्याचा आढावा घेणारा 'सर्वस्पर्शी प्रतिभावंत' हा ग्रंथ. आस्वादक समीक्षा, मुलाखत यासह येरणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अज्ञात पैलू या पुस्तकातून आपल्या समोर येतात. अशा धाटणीची अनेक पुस्तके किंवा गौरवग्रंथ मराठीत सातत्याने प्रकाशित होत असले तरीही हे पुस्तक याहून वेगळे आहे. पुनाराम निकुरे यांनी यात अस्तित्ववादी समीक्षेला वाव देत उपयोजित समीक्षेची मांडणी, सर्वांगीण सखोल चिकित्सक दृष्टीने आपली भूमिका मांडली आहे. खरेतर यामुळे साहित्याची उंची व परिणामकारकता दर्शवित रसिक,साहित्य अभ्यासक यांनाही मार्गदर्शनपर ठरणारा हा ग्रंथ होय. निकुरे हे साहित्य कलाकृतीकडे सर्व बाजूंनी त्रयस्थपणे बघत आकलन, अर्थ निर्णयन, अन्वयन, आस्वादन व मूल्यमापन या सर्वांग भूमिकेतून विचारप्रेरित होत, साहित्यातील सौंदर्याचे रसपान करायला लावतात.
- | Author: पुनारा
- | Publisher: Pencil
- | Publication Date: Sep 29, 2021
- | Number of Pages: 264 pages
- | Binding: Paperback or Softback
- | ISBN-10: 9354585728
- | ISBN-13: 9789354585722